Pune Crime News | पुणे: सलून कामगाराचा ३८ वेळा चाकूने भोसकून खून; भावानेच केलं ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest
पुणे: सलून कामगाराचा ३८ वेळा चाकूने भोसकून खून; भावानेच केलं ठार

पुणे: सलून कामगाराचा ३८ वेळा चाकूने भोसकून खून; भावानेच केलं ठार

बारामतीजवळच्या एका गावात एका सलून कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मामेभावानेच त्याला चाकूने भोसकून ठार केलं आहे. एका जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: मानसिक त्रास देण्याच्या कारणावरून केला भावाने भावाचा खून

या प्रकरणातला आरोपी पळून जात असतानाच त्याला रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडलं. मृत गजानन पवार हा हिंगोली जिल्ह्यातला रहिवासी असून तो बारामतीतल्या एका सलूममध्ये काम करत होता. तर आरोपी संतोष गुळमुळे हा त्याचाच मामेभाऊ आहे. बारामतीतल्या रुई या गावात पवारचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित केलं.

हेही वाचा: रूई येथे युवकाकडून मावसभावाचा खून

प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पवारचा मामेभाऊ संतोषला अटक केली. संतोष काही काळापूर्वी त्याच सलूनमध्ये काम करत होता. पोस्टमार्टम झाल्यानंतर लक्षात आलं की पवार याला ३८ वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक तपासात हा खून जुन्या वादातून झाल्याचं आढळलं आहे.

Web Title: Maharashtra Pune Baramati Barber Stabbed 38 Times Dies Cousin Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..