
"Heavy rains lash Marathwada and Konkan region, IMD issues fresh alert for thunderstorms and intense showers in multiple districts of Maharashtra."
esakal
Summary
विजांच्या कडकडाटासह राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे.
वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून उत्तर भारताच्या अनेक भागांतून तो परतला आहे.
मराठवाड्यातील काही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीने कहर केला आहे. या भागात अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात शुक्रवारपासून ( २६ सप्टेंबर) पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. तर मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.