Maharashtra Rain Update
ESAKAL
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.