पालकांनो लक्ष असू द्या! कुठे शाळा बंद? प्रशासन काय म्हणतंय?

मुंबई विभागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे.
Mumbai Rains Updates | Mumbai School Updates
Mumbai Rains Updates | Mumbai School Updatesप्रशांत चव्हाण, सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विभागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या परिस्थितीत आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, आणि हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा. (Mumbai School Updates)

तसेच आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना गुरूवारी १४ जुलै, रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना रात्री उशिरा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत., त्यामुळे त्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही उपसंचालक संदीप संगवे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (Mumbai Rains Updates)

मुंबई विद्यापीठाच्या 14 जुलै रोजीच्या परीक्षा रद्द

मुंबईसह कोकणातील अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने गुरुवार, १४ जुलैच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. गुरुवारी मुख्यतः अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतर विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

येथील शाळा ता. 14 रोजीबंद

पालघर, नांदेड, हिंगोली

14 आणि 15 रोजी शाळा बंद

ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली

येथील शाळा ता. 16 पर्यंत बंद

पुणे, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com