esakal | Corona Update : नव्या रुग्णांची संख्या पुन्हा १० हजाराच्या पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने गुरुवारी राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली.

Corona Update : नव्या रुग्णांची संख्या पुन्हा १० हजाराच्या पुढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच राज्यातील कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढू लागली. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत होती. पण गुरुवारी (ता.१०) रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी राज्यात १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासात ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या १० हजाराच्या आत होती. पण गुरुवारी रुग्णसंख्येने १० हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ वर पोहोचली आहे. ()

गुरुवारी दिवसभरात ११ हजार ४४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ६९३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ५६ लाख ८ हजार ७५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा: ATM मधून पैसे काढणं पडणार महागात; RBI लागू करणार नवा नियम

राज्यात दिवसात १९१५ मृत्यूंची नोंद

कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने गुरुवारी राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. गुरुवारी झालेल्या मृत्यूंमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे ६१ मृत्यू नोंदवण्यात आले, तर मिरा भाईंदर ३३, कोल्हापूर २५, मुंबई २२ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्यूदर १.७७ टक्क्यांवर इतका आहे. नोंद झालेल्या ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील तर १५४ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा एक लाख तीन हजार ७४८ वर पोहोचला आहे.

हेही वाचा: युवीच्या स्वप्नाआड आला धोनी!

१५२२ अतिरिक्त मृत्यूची नोंद

राज्य सरकार राज्यातील मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. राज्यात ११ हजारांहून अधिक मृत्यू नोंदविले गेले नसल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर गुरुवारी मृतांचा आकडा वाढल्याचे दिसले. गुरुवारी दैनंदिन मृत्यूपेक्षा १५२२ अतिरिक्त मृत्यूंची नोंद पोर्टलवर करण्यात आली. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'दारिद्र्य कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन करा'; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लिमांना आवाहन

मुंबईत ६६० रुग्ण

मुंबईत गुरुवारी दिवसभरात ६६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ६ लाख ८१ हजार २८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ हजार १२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.