Corona Update : राज्यात दिवसभरात 2962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona-covid19

Corona Update : राज्यात दिवसभरात 2962 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आज २,९६२ नवीन कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली गेली; त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता २२,४८५ वर पोहचली आहे. तसेच मुंबईतील एका ६० वर्षीय महिलेला राज्यात BA.4 व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. या महिलेचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. यासोबतच राज्यातील BA.4 आणि BA.5 रुग्णांची एकूण संख्या ६४ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ७,६७१ सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज तब्बल ३,९१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९७.८७ टक्के इतका राहीला आहे. राज्यात आज २,९६२ नवे रुग्ण आढळले तर तब्बल ६ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७८,१४,८७१ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८२ टक्के इतकं झालं आहे.

हेही वाचा: उमेश कोल्हे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; नेमकं काय घडलं?

दरम्यान देशात देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १६ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेत सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी दिवसभरात १६ हजार १०३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

हेही वाचा: Video : बंडखोर यामिनी जाधव उभ्या राहताच विधानसभेत EDच्या घोषणा

Web Title: Maharashtra Reports 2962 Fresh Corona Cases Today Active Cases Reaches At 22485

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus