Corona Update : राज्यात आजही रुग्णसंख्या एक हजारच्या आत; तर 15 रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आजही रुग्णसंख्या एक हजारच्या आत; तर 15 रुग्णांचा मृत्यु

राज्यात आजही रुग्णसंख्या एक हजारच्या आत; तर 15 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज ही नवीन कोविड रुग्ण हजारच्या आत आले असून आज 906 नवे रुग्ण सापडले. आज 15 रुग्ण दगावले.आज 918 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,72,681 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.65 % एवढे झाले आहे.

हेही वाचा: पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,707 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 11,704 इतकी आहे.आज 906 रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,28,744 झाली आहे.

हेही वाचा: रविवारी होणारी TET आणि UGC नेट परीक्षा एकाच दिवशी; वाचा सविस्तर

पुणे, नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 6,नाशिक 6,कोल्हापूर 2,लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 99,369 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top