Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई : राज्यात आज 997 नवे रुग्ण सापडले. काल 1094 बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक असून 1016 बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,64,948 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.64 % एवढे झाले आहे.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

आज मृतांचा आकडा मात्र वाढला असून आज 28 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.काल 17 मृत्यूंची नोंद झाली होती. मृतांचा एकूण आकडा 1,40,475 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 12,352 इतकी आहे.आज 997 रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,21,420 झाली आहे.

हेही वाचा: धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माविरोधात चौथी तक्रार समोर, रिझवान कुरेशींनीही दाखल केलीये FIR

नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 12, नाशिक 3, पुणे 8, कोल्हापूर 1, लातूर 4 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,10,264 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 876 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top