#MaharashtraWithShivsena लढा शिवसैनिकांनो! अवघा महाराष्ट्र तुमच्यासोबत...

टीम ईसकाळ
Monday, 11 November 2019

सोशल मीडियाही शिवसेनेसोबत खंबीर उभी आहे. ट्विटरवर #MaharashtraWithShivsena हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.

मुंबई : सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नसतानाच शिवसेना बहुमत मिळवण्यासाठी धडपड करत आहे. भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही, त्यामुळे राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. शिवसेनेला 24 तासांच्या मुदतीत बहुमत सिद्ध करायचे आहे. अशा परिस्थित मुंबईतल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय सूत्रे हालताना दिसत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियाही शिवसेनेसोबत खंबीर उभी आहे. ट्विटरवर #MaharashtraWithShivsena हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. तर काल  ट्विटरवर  #ShivSenaCheatsMaharashtra हा हॅशटॅगही ट्रेंडिंग होता. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नकटं असावं पण, धाकटं असू नये; शिवसेनेला आला प्रत्यय 

 

शिवसेनेचे खासदार व सध्या चर्चेत असलेले नेते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन, त्यांची भूमिका संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असे सांगितले. त्यानंतर त्यांची मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. दरम्यान मुंबईत शरद पवार यांनी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली, तर दिल्लीत सोनिया गांधींनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली आहे.

सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार

 

आज (ता. 11) संध्याकाळी साडेसातपर्यंत शिवसेनेला सत्तास्थापनेची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेला बहुमताचा आकडा सिद्ध करावा लागेल. शिवसेना सर्वप्रकारे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सोशल मीडियावर नेटकरी भाजपवर टीका करत शिवसेनेला पाठिंबा देताना दिसत आहेत. 

तत्त्वांवर बोलल्या भाजपवासी चित्राताई अन् झाल्या ट्रोल!

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra With Shivsena hashtag trending on social media