Maharashtra Smart Ration Card
esakal
Maharashtra Smart Ration Card: राज्यातील रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे पारंपरिक कागदी रेशन कार्डांच्या जागी क्यूआर कोड असलेले स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असून, ही नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.