

Manikrao Kokate Resignation
ESakal
अखेर महाराष्ट्राचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे. नाशिक न्यायालयाने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. नाशिक न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. यानंतर आता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांच्याविषयी मोठी अपडेट समोर आले आहे.