

Maharashtra: India's Startup Capital
Sakal
मुंबई : ‘‘भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’ असून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.