कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक अन्यथा दंड

नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
मास्क
मास्क sakal
Updated on

पुणे : राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. याचे उल्‍लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कमेच्या स्वरूपात दंड वसूल केला जाणार आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या काही नियमांमध्ये शिथिलता दिली असली तरी, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढेही मास्कचा वापर, सतत हात धुणे, दोन व्यक्तीत पुरेसे अंतर राखणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. राज्य सरकारने सरकारी, निमसरकारी आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधकाकरक केला असल्याचे कुंटे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

मास्क
जालना : आष्टीत कापसाला आठ हजारांचा भाव

कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर २४ मार्चपासून देशभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आणि तिसऱ्या लाटेची डोक्यावरील टांगती तलवार अद्यापही कायम आहे. मात्र सध्या कोरोना नियंत्रणात येत असल्याने, अर्थचक्राला चालना देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

याआधी केवळ गर्दीचे व्यवस्थापन न करणे, दोन व्यक्तीत पुरेसे अंतर न राखणे, मास्कचा वापर टाळणे आदी कारणांमुळेच राज्याला कोरोना संसर्गाच्या दोन लाटेला सामोरे जावे लागल्याचे मत कुंटे यांनी या आदेशात व्यक्त केले आहे.

कर्मचाऱ्यांना काय खबरदारी घ्यावी लागणार

- कार्यालयात नियमित मास्क वापरावा लागेल

- मास्क हा पूर्णपणे तोंड झाकणारा असला पाहिजे

- मास्क वापराबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य

- हा नियम सरकारी, निमसरकारी आणि खासगी कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना लागू

- कर्मचाऱ्यांनी कोरोना डोस घेतल्याबाबतची तपासणी कार्यालय प्रमुखांना करावी लागेल

- कोरोना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणेही कर्मचाऱ्यांवर बंधनकारक

- कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ketan Agarwal Murder Case
Sixteen runners successfully completed the 225-km Shakti Run from Alandi to Pandharpur over three days and offered prayers to Lord Vitthal.
The India Meteorological Department has issued a red alert for the ghat areas of Pune district amid continued rainfall.
SPUCTO has announced an indefinite protest demanding promotion benefits for MPhil-qualified contractual professors in Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com