ब्रेंकिग : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना संक्रमित; खबरदारी घेण्याचं आवाहन

rajesh tope
rajesh tope

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संक्रमित झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. ते सध्या डॉक्टरांचा सल्ला घेत असून त्यांनी प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यमंत्री म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

काल राज्यात 5427 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रुग्णसंख्या दोन हजारच्या आसपास स्थिर राहिली होती. मात्र आता ती वाढताना दिसत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुग्णवाढ होत असल्याने पुन्हा एकदा कडक नियमांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने  पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढलं आहे. रुग्णाची रोडावलेली संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देखील कोरोनाची लागण  झाली आहे. कालच याबाबतची माहिती त्यांनी त्यांनी फेसबुक  अकाउंट वरून दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com