sugar
sugarsugar

राज्यात ७४१ लाख टन ऊस गाळप; ७४६.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन

यंदाच्या गाळप हंगामात दोन फेब्रुवारीअखेर राज्यात ७४१.३४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७४६.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

माळीनगर, (जि.सोलापूर) : यंदाच्या गाळप हंगामात दोन फेब्रुवारीअखेर राज्यात ७४१.३४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७४६.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा दहा टक्‍क्‍यांपेक्षा किंचित अधिक आहे. सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी कारखान्यांच्या तुलनेने ५२ टक्के ऊस गाळप व ५४ टक्के साखर उत्पादन केले आहे.(Maharashtra state sugar production)

यंदा राज्यात ९८ सहकारी व ९९ खाजगी मिळून १९७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सात लाख ९४ हजार ८०० टन इतकी आहे. सहकारी साखर कारखान्यांना तीन कोटी ९२ लाख ४७ हजार ६१४ टन उसाचे गाळप करून १०.४२ टक्के सरासरी साखर उताऱ्याने चार कोटी नऊ लाख पाच हजार ४६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तुलनेत खाजगी कारखान्यांनी तीन कोटी ४८ लाख १९ हजार ३४९ टन ऊस गाळप करून ९.६९ टक्के साखर उतारा मिळवत तीन कोटी ३७ लाख ३२ हजार ४३४ क्विंटल साखर तयार केली आहे.

sugar
संपूर्ण शुल्क भरले नाही तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रक द्या; विद्यापीठाचे आदेश

कोल्हापूर विभागात सर्वाधिक गाळप

कोल्हापूर विभागात सर्वाधिक ऊस गाळप व साखर उत्पादन झाले आहे. त्याखालोखाल सोलापूर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. गाळप व साखर उत्पादनाबरोबरच कोल्हापूर विभाग साखर उताऱ्यात राज्यात अग्रेसर आहे. पुणे व नांदेड विभाग साखर उताऱ्यात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

जवाहर आणि दुधगंगा वेदगंगा आघाडीवर

हुपरी येथील जवाहर शेतकरी कारखान्याने १३ लाख ५८ हजार ३०० टन ऊस गाळप करून राज्यात मुसंडी मारली आहे. पिंपळनेर (जि.सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे कारखाना १३ लाख १९ हजार ४३४ टन उसाचे गाळप करून दुसऱ्या तर कर्जत येथील अंबिका शुगर १० लाख ८२ हजार ८९५ टन उसाचे गाळप करून तृतीय क्रमांकावर आहे. बिद्री (जि.कोल्हापूर)येथील दुधगंगा वेदगंगा कारखाना १४.३२ टक्के इतका विक्रमी साखर उतारा मिळवून राज्यात आघाडीवर आहे.

sugar
Movie Review : शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार 'फास'

दोन फेब्रुवारीअखेरचे ऊस गाळप

विभाग ऊस गाळप (टनात) साखर उत्पादन (लाख क्विंटल) उतारा (टक्‍क्‍यांमध्ये)

कोल्हापूर १७६.२१ २०२.३३ ११.४८

पुणे १४९.८६ १५३.५४ १०.२५

सोलापूर १७५.९१ १५९.७० ९.०८

अहमदनगर ९९.३७ ९४.७५ ९.५४

औरंगाबाद ६०.५१ ५७.३४ ९.४८

नांदेड ७१.१७ ७ १.८५ १०.१०

अमरावती ५.३२ ४.७६ ८.९५

नागपूर २.९९ २.६१ ८.७३

एकूण ७४१.३४ ७४६.८८ १०.०७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com