TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

CJP Agitation : NEET वादानंतर TET पेपरफुटी ही सरकारच्या अपयशाचे उदाहरण असल्याचा आरोप करण्यात आला. पेपर फुटल्यामुळे रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश होऊन भिवंडीतून तिघांना अटक झाली.
TET Exam Paper Leak

TET Exam Paper Leak

esakal

Updated on

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेने देशातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या मुद्द्यावर भाष्य करताना, 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी शनिवारी सरकारवर जोरदार टीका केली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com