स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Startup

स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

भारत सरकारने सादर केलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात महाराष्ट्र 'स्टार्टअप्स' मध्ये देशात अव्वल आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule)यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीचे कौतुक केले आहे.

सुप्रिया सुळे ट्वीटद्वारे म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारने उद्यमशीलतेची जोपासणा व तिचा विकास करण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. याचाच परिणाम म्हणून भारत सरकारने प्रकाशित केलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात आपला महाराष्ट्र ११ हजार ३०८ मान्यताप्राप्त 'स्टार्टअप्स' सह देशात अग्रस्थानी आहे.”

समोर आणखी ट्वीट करत त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राने सातत्याने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकार नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्नशील असून या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठीही हातभार लावत आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री मा. सुभाषजी देसाई यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे मनापासून आभार.”

हेही वाचा: धक्कादायक! पतीनं पत्नीसह स्वतःच्या मुलीवर फेकलं उकळतं तेल

सध्या महाराष्ट्र हे ‘स्टार्टअप’( Startup)मध्ये देशात क्रमांक एकवर असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात ११ हजार ३०८ स्टार्टअप्स' सह महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवले आहे.

Web Title: Maharashtra Tops In Startup Among Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..