Tukaram Mundhe : सामान्यांची दिवाळी आरोग्यदायी होणार! तुकाराम मुंढेंची FDA मधून बदली नाही; भेसळीविरोधातील लढाई सुरूच राहणार

Maharashtra FDA : तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की त्यांची अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातून बदली झालेली नाही. भेसळयुक्त अन्न, असुरक्षित अन्न आणि निकृष्ट/बनावट औषधांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Tukaram Mundhe : सामान्यांची दिवाळी आरोग्यदायी होणार! तुकाराम मुंढेंची FDA मधून बदली नाही; भेसळीविरोधातील लढाई सुरूच राहणार
Updated on: 

अन्नातील भेसळ आणि निकृष्ट औषधांविरोधात कारवाई करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आपली अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातून बदली झालेली नसून आपण आयुक्त म्हणून कार्यरत असल्याचं मुंढे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नातील भेसळीविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com