Maharashtra Legislative Council Election 2026 Announced
esakal
राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या आहेत. जून महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून ही निवडणूक रखडली होती. मात्र, आता ही निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात घडमोडींना वेग आला आहे.