इथे मात्र - कॉंग्रेसचे सेलिब्रेशन, भाजप कार्यकर्त्यांचा काढता पाय । Election Results 2019

Amit Deshmukh
Amit Deshmukh

लातूर : काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर पोचल्याचा अंदाज घेऊन मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या भाजपच्या आणि 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी परिसरातून काढता पाय घेतला. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सोव साजरा करायला सुरवात केली.

शहरात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून देशमुख आघाडीवर होते. पण मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या वेगवगेळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपलीच सीट लागेल असा विश्वास वाटत होता. मात्र, प्रत्येक फेरीत देशमुख हेच आघाडीवर येत असल्याचे पाहून भाजप आणि वंचित च्या कार्यकत्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. 

अमित देशमुख यांना 17 व्या फेरी अखेर 74 हजार 692 तर भाजपचे उमेदवार 50 हजार 899 मते मिळाली आहेत. देशमुख आघाडीवर असल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके फोडत आणि फुले उधळत जल्लोष करायला सुरवात केली आहे.

अशी आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची पार्श्‍वभूमी

लातूर शहर मतदारसंघ हा 2009 मध्ये स्थापन झाला. या मतदारसंघात पहिल्याच निवडणुकीत 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 2009 मध्ये झालेल्या या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख हे विजयी झाले. त्यांना एक लाख 13 हजार सहा मते मिळाली होती. त्यांनी बहुजन समाज पक्षाचे खय्युमखान पठाण यांचा 89 हजार 490 मतांनी पराभव केला होता.

त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख पुन्हा निवडूण आले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे शैलेश लाहोटी यांचा 49 हजार 465 मतांनी पराभव केला होता. श्री. देशमुख यांना एक लाख 19 हजार 656 मते तर श्री. लाहोटी यांना 70 हजार 191 मते मिळाली होती.

आता 2019 च्या निवडणुकीतही कॉंग्रेसचे अमित देशमुख आणि भाजपचे शैलेश लाहोटी यांच्या पुन्हा लढत होत आहे. मागील दोन निवडणुकीचा निकाल पाहता श्री. देशमुख यांनी एक लाखापेक्षा जास्तच मते घेतली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com