राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Update Maharashtra कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. या भागातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
Cloudy Weather

Cloudy Weather

sakal

Updated on

राज्यातील काही जिल्ह्यात सोमवारी अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, अलीबाग, रायगड, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, सोलापूर या भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. येत्या २ दिवसातही राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. या भागातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com