

Weather Update
esakal
Bay Of Bengal Weather : बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिटवाह चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम राज्यात गेल्या काही दिवसांत थंडीची लाट थोडी कमी झाल्याची स्थिती आहे. सकाळच्या वेळी जाणवणारी थंडी कमी झाली असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे. कोल्हापूर, सांगली भागात आकाश निरभ्र असून तापमानात चढ-उतार पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे.