आज घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या Weather Update

Weather forecast
Weather forecastSakal Digital

Maharashtra Weather Update 18 July

पुणे : दोन आठवड्यांपासून जोरदार बॅटींग करणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. पुण्यासह राज्यभरात पावसाने अनेक ठिकाणी उघडीप दिली असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. निवडक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली होती.

अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्राने कोकण किनारपट्टीवरील बाष्प खेचून घेतल्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडत आहे. सोमवारी हवामान सामान्यतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला. कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather forecast
Maharashtra Rain : हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ का फसला?

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मुंबईतही पावसाची उघडीप (Rainfall in Mumbai, Pune)

मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाने रविवारी उघडीप घेतली. पावसाने सुट्टी घेतल्याने दिवसभर बराच वेळ ऊन पडल्याचे दिसले. पावसाने पाठ फिरवल्याने दिवसभरात ०.९५ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, रविवारी पुण्यात फक्त ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईत शनिवा पासूनच पावसाचा जोर ओसरला आहे. रविवारी सायंकाळीपर्यंत कुलाबा ०.४ तर सांताक्रूझ ०.० मिमी पाऊस झाला. शहर ०.५९ , पूर्व उपनगर १.०१ तर पश्चिम उपनगर १.२७ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत दिवसभरात केवळ ०.९५ मिमी पाऊस झाला. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत २ ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या तर ८ ठिकाणी झाडे/फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. दिवसभरात मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com