Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maharashtra Weather Update : राज्यातील २० जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Heavy Rain Maharashtra Weather Update

Heavy Rain Maharashtra Weather Update

esakal

Updated on

Low Pressure System Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण छत्तीसगडमार्गे आज (ता. १३) विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा जोर वाढणार आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com