Maharashtra Rain: यलो अलर्ट कोणत्या भागात, जाणून घ्या

Rain Monsoon 2022 Weather Update
Rain Monsoon 2022 Weather UpdateSakal Digital

Maharashtra Weather Update 17 July

पुणे : राज्यात मागील दोन आठवड्यांपासून धुव्वाधार बरसणाऱ्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. रविवारी (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून राज्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली. पूर्व किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र, किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा, त्यात दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, या सर्व प्रणाली पोषक असल्याने पावसाने जोर धरला होता. मात्र आता धुव्वाधार हजेरीनंतर पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे तर गुजरातच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेला सरकण्याची शक्यता आहे, असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले. परिणामी, सोमवारपासून (ता. १८) राज्यात पावसाचा जोर कमी होईल. (Monsoon Update 2022)

Rain Monsoon 2022 Weather Update
पावसाळ्यात अपघात होवू नये म्हणून ही घ्या काळजी!

एकीकडे उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच, दुसरीकडे अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरातच्या पोरबंदरपासून ७० किलोमीटर पश्‍चिमेकडे तर ओखापासून १०० किलोमीटर दक्षिणेकडे असलेली ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकून ओमानकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यात मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. (Maharashtra Rain News)

Rain Monsoon 2022 Weather Update
हेल्थ वेल्थ : पावसाळा आणि रोगप्रतिकारकता

रविवारी पावसाचा यलो अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा.

राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
नगर : ०.८
कोल्हापूर : ७
महाबळेश्‍वर : ५७
नाशिक : ३
सांगली : ५
सातारा : ६
मुंबई : ६
सांताक्रूझ : ६
रत्नागिरी : ०.९
डहाणू : १४
अकोला : २
ब्रम्हपूरी : १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com