पुन्हा मुसळधार पाऊस! राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update Rainfall
Maharashtra Weather Update RainfallSakal
Updated on

मुंबई : नवी दिल्लीसह काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे. मात्र, आता हा पाऊस आणखी सक्रीय होण्याची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं माहिती दिली आहे.

Maharashtra Weather Update Rainfall
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह पाऊस, राजधानीला अवकाळीने झोडपलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. काही ठिकाणी उन्हाचे चटके देखील जाणवू लागले आहेत. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात थंडी आहे. यातच आता पावसाचं पुन्हा आगमन होणार आहे. नागपुरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. आता नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

उत्तर भारतातील वातावरणामुळे पाऊस? -

एक दिवसापूर्वी हवामान विभागाने नवी दिल्लीसह हरियाणा, गुरुग्राम आणि उत्तर भारतातील काही भागात पावासाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पावासानं जोरदार हजेरी लावली. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com