

Maharashtra Weather Update
ESakal
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपली आहे. नैऋत्य मान्सून गोव्यात दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत तो कोकण किनारपट्टीमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याने, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.