Maharashtra Weather : पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता; ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra Weather

Maharashtra Weather

esakal

Updated on: 

Western Maharashtra Rain : पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज (ता. ८) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com