esakal | मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला युवक काँग्रेसचा प्रतिसाद; करणार 'हे' महत्त्वाचे काम!
sakal

बोलून बातमी शोधा

Thackeray-Youth_Congress

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सुमारे 16000 रक्ताच्या पिशव्या राज्यातील रक्तपेढ्यांत जमा केल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला युवक काँग्रेसचा प्रतिसाद; करणार 'हे' महत्त्वाचे काम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक महामारी कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच राज्याच्या रक्तपेढ्यांमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२४) नागरिकांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळेस देखील रक्तदानाच्या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सुमारे 16000 रक्ताच्या पिशव्या राज्यातील रक्तपेढ्यांत जमा केल्या होत्या. 

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?

युवक कॉंग्रेसतर्फे राज्यभर परप्रांतीय मजूर आणि गरीब लोकांना अन्नधान्य तसेच मोफत पार्सल जेवणाची व्यवस्था सुरूच आहे. विशेष म्हणजे राजस्थान, दिल्ली, गुजरात येथे अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना राज्यात स्वगृही सुखरूपपणे आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

नुकतेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील 29 हजार कुटुंबाना मदत केली असून केंद्राकडे न्याय योजना लागू करण्याची मागणीही रेटून धरली आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सदैव तत्पर राहिली आहे. यावेळेस युवक काँग्रेस 25 हजार रक्ताच्या बाटल्या जमा करेल, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला आहे.

- विमान सेवा 'टाय टाय फिस'; राज्य सरकारचा आदेश आला आडवा!