esakal | विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी? राजकीय वर्तुळात चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

vishwajit kadam Said government help who Victim girl on rape

विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी?

sakal_logo
By
- संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली) : केंद्रानंतर आता राज्य मंत्रिमंडळातही खांदेपालट होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.काँग्रेसमधील दोन अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्याजागी एका काँग्रेस नेत्यासह एका राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यास काँग्रेसच्या हायकमांडने अनुकूलता दर्शविली असून सहकार व कृषी राज्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावणाऱ्या डॉ.विश्वजित कदम यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यामुळे डॉ.विश्वजित कदम यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागेल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीशी दोन हात करण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तर अशा परिस्थितीतही सध्या काही मुद्द्यावरुन आघाडी सरकारमध्ये धुसफुस सुरु आहे.अशातच काँग्रेससह शिवसेनेही स्वबळाचा नारा दिला आहे.तसेच राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,महानगरपालिका,नगरपालिका व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला करुन त्या जागी चांगली कामगिरी करणाऱ्या नवीन चेहऱ्याना संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा विचार आहे.

हेही वाचा- दीड लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांचे सुपुत्र व सध्या राज्य मंत्रिमंडळात कृषी, सहकार राज्यमंत्री व भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून डॉ.विश्वजित कदम यांनी प्रभावीपणे काम केल्यामुळे हायकमांडने त्यांच्या कामाची दखल घेतली असून आता त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे पलूस-कडेगावसह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

loading image