विरोधकांना 'करारा जवाब मिलेगा', महाविकास आघाडीची ३० एप्रिलला संयुक्त सभा

MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार ३० एप्रिलला पुण्यात संयुक्त मेळावा घेणार आहे. या विशाल सभेत महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष सहभागी होणार आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

या रॅलीत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व मंत्री आणि नेते सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. (MVA government rally)

महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते पुण्यात उपस्थिती लावणार आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी मोर्चेबांधणी होणार आहे. तर महागाईविरोधात पाऊल चलणार असल्याचं कळतंय.

MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव जनता हाणून पाडील - बाळासाहेब थोरात

लाउडस्पीकर प्रकरणात सातत्याने होणारे राजकीय हल्ले, नमाज आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार या सभेचे आयोजन करत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच दिवशी राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत.

MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
‘मविआ’ सरकार सक्रिय; भाषेचा द्वेष अन आक्रमणही नको!

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विविध मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केले. केंद्रीय यंत्रणांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात छापासत्र सुरू केलं. यातून भाजपने संधी साधत वेगवेगळ्या विषयांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रय़त्न केला. महाविकास आघाडीचे काही मंत्री देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. तिन्ही पक्षांमध्ये परिस्थिती अलबेल आहे की नाही, हा प्रश्न कायम उपस्थित केला जातो. मात्र, आता विरोधकांना करारा जवाब देण्यासाठी पुण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com