सत्ता नसेल तर भाजपवाले वेडे होतील : संजय राऊत

टीम ईसकाळ
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मुंबई : 'भाजपने अजित पवारांना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद व 20 मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती मिळते. शिवसेनेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले नाही आणि आता अजित पवारांना ही ऑफर देणं भाजपला शोभतं का? भाजपने दिलेलं वाचन पाळलं नाही,' असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.    

संजय राऊत यांचं नवं ट्विट, पाहा काय म्हणाले!

'तुमच्याकडे बहुमत होतं, तर लपूनछपून शपथविधी का केला? भाजपला चंबळच्या डाकूंसारखी अशी गुंडागिरी शोभते का? राष्ट्रवादीच्या 2 आमदारांना हरियानातील गुरूग्राममध्ये हॉटेलात कोंडून ठेवले आहे. हरियाना पोलिसांचा गैरवापर केला. भाजपला जर सत्ता मिळाली नाही, तर ते वेडे होतील. त्यांना पराभवाचा धक्का पचणार नाही. आमची सत्ता आली तर आम्ही वेड्यांचे इस्पितळ काढू व त्यांना पुरून उरू,' असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तसेच शासकीय संस्था जसं की, सीबीआय, ईडी, पोलिस, सेबी या ऑपरेशन कमळ यशस्वी करण्यासाठी भाजपला मदत करत आहेत, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली. आम्हीही राज ठाकरेंनी भेटायला जातो, कुटुंबाचा प्रश्न असतो, आम्ही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून जायचो, तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटायला जात आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपवाल्यांनो सावधान! काँग्रेसचा चाणक्य येतोय...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut criticizes BJP in today s PC