अन् फोन आल्याने सुप्रिया सुळे विधानभवनातून पळतच गेल्या, का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सुप्रिया सुळे साधारण सातच्या सुमारास विधानभवनात आल्या होत्या. त्यांनी अजित पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन स्वागत केले. त्यानंतर त्या आमदारांचे शपथविधी सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत बसल्या होत्या.

मुंबई : आज (बुधवार) सकाळपासून नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आमदारांचे शपथविधी सुरु असतानाच अचानक फोन आला आणि विधानभवनातून बाहेर पळतच गेल्या. यामुळे तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सुप्रिया सुळे साधारण सातच्या सुमारास विधानभवनात आल्या होत्या. त्यांनी अजित पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन स्वागत केले. त्यानंतर त्या आमदारांचे शपथविधी सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत बसल्या होत्या. काही आमदारांचे शपथविधी झाल्यानंतर त्या विधानभवनाबाहेर आल्या. त्याठिकाणी असलेल्या आदिती तटकरे यांच्यासोबत फोटो काढल्यानंतर त्यांना फोन आला. त्यानंतर तेथून त्या पळतच बाहेर पडल्या. यामागील कारण समजू शकले नाही.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

त्यापूर्वी आज सकाळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ऐक्य दाखविले त्याबद्दल त्यांचे आभार. अजित पवार आणि आमच्यात कोणताच दुरावा नव्हता. आगे आगे देखो होता है क्या.

महाविकासआघाडीची उजडली 'पहाट'; आमदारांचे शपथविधी सुरु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule went from assmbly in hurry at Mumbai