

Maharashtra Grass Farming Scheme
ESakal
मुंबई : ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंतच्या पडीक सरकारी आणि महसूल विभागाच्या जमिनींवर गवताची लागवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, पडीक सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर नेपियर गवत आणि बांबूची लागवड करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संघटनांना तीन वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाईल.