राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Slum Legal Protection: महाराष्ट्रातील महायुती सरकारने झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०११ पूर्वी बांधलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात येणार आहे.
Maharashtra Slum Legal Protection

Maharashtra Slum Legal Protection

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली की, वन विभाग आणि विविध केंद्र व राज्य सरकारी प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वी बांधलेल्या सर्व झोपडपट्ट्यांना राज्य सरकार संपूर्ण कायदेशीर संरक्षण देईल. या रहिवाशांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांमार्फत योग्यरित्या केले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com