

Maharashtra Farmer Loan Waiver 2026 latest update and delay reason
ESakal
मुंबई : महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी अशा मोठ्या योजनेची घोषणा केली. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी कधी होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.