
Government decision to keep shops open 24 hours
ESakal
दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रहिवाशांना आणि व्यवसायांना मोठा दिलासा देत सर्व दुकाने आणि आस्थापनांना २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परमिट रूम, बिअर बार आणि वाईन शॉप्ससारख्या दारू विकणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण याचे काही फायदे आणि तोटेही होणार आहेत. या निर्णयामुळे महसुलात वाढ होणार आहे. पण दुसरीकडे सुरक्षेवर प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक स्तरांवर त्याचे पडसाद उमटणार असल्याचे दिसून येणार आहे.