चित्रपटातील 'त्या' सीनमुळे मांजरेकरांवर गुन्हा दाखल

चित्रपटात प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याने हा सर्व वाद उठलाय
‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट
‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटटिम ई सकाळ

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी दिग्दर्शित केलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट चांगलाच वादात पडलाय. या चित्रपटात प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याने हा सर्व वाद उठलाय. हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला.

१४ जानेवारी रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशीत करण्यात आला. चित्रपटातील अश्लील दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women ) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे (Information and broadcasting ministry) याच्याविरोधात तक्रार केली . त्यावेळी या ट्रेलरमध्ये प्रौढवयीन महिला आणि अल्पवयीन मुलांची दाखवली गेलेली आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. मात्र या तक्रारीनंतर या सिनेमाचा ट्रेलर युट्यूबसह (You Tube )इतर सर्व सोशल मीडियावरून हटवण्यात आला होता. मात्र चित्रपटातील दृश्य हटवण्यात आली नाही.

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट
ICMRची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मोठी माहिती

क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकरांविरोधात वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे तर या प्रकरणी मांजरेकरांशिवाय नरेंद्र, श्रेयंस हिरावत आणि चित्रपटाशी संबंधित एनएच स्टुडिओ यांच्यावरही आरोप करण्यात आले आहे. POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कोर्टात चित्रपट दिग्दर्शक आणि इतर निर्मात्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी अर्जही करण्यात आले आहे. सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट
Video|...अन् उमेदवारी अर्ज घेऊन धावत निघाले युपीचे क्रीडा मंत्री

क्षत्रिय मराठा सेवा संस्थेचे वकील डीवी सरोज म्हणतात, “चित्रपटाच्या आशयामुळे संपूर्ण समाजात चुकीचा संदेश गेला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने झालीत. चित्रपटावर बंदी घालावी आणि चित्रपट बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. या प्रकरणाची सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com