विधान परिषदेचे उपसभापतिपद बिनविरोध करा : रामराजे नाईक निंबाळकर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

कोरोना विषाणूंच्या जागतिक साथीचा विचार करून विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना केली.

मुंबई - कोरोना विषाणूंच्या जागतिक साथीचा विचार करून विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी (ता. ८) होणाऱ्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तर भाजपकडून भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनामुळे अनेक सदस्य सभागृहात उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलावी, निवडणूक घेण्याची घाई करू नये असे आवाहन सत्ताधारी पक्षाला केले.

एमपीएससीचे सुधारीत वेळपत्रक जाहीर; वाचा, केव्हा होणार परीक्षा? 

सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या कोरोनाची साथ आहे. मी सुद्धा सतत फिरत असतो. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यावेळी सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधी पक्षासोबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले.   

उपसभापतिपदासाठी विजय ऊर्फ भाई गिरकर यांचा अर्ज भरला असला तरी भाजपचे तब्बल सहा सदस्य अधिवेशनाला उपस्थित नाहीत. डॉ.परिणय फुके आणि गोपीचंद पडळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने ते दोघे गैरहजर आहेत तर विदर्भातील काही आमदार अधिवेशनाला आलेलेच नाहीत.

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी 'एनआईए' अ‍ॅक्शन मोडमध्ये 

भाजपची संख्या चारने कमी?
परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपची संख्या महाविकासआघाडीपेक्षा चारने कमी आहे. सध्या १२ सदस्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. पण शिक्षक आमदारांची मते कुणाला यावर बरीच गृहितके अवलंबून आहेत.

विधान परिषद क्षणचित्रे 

  • सुमारे २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडल्या.
  • प्रसाद लाड, मनीषा कायंदे, संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नावे जाहीर  
  • शिवसेनेच्या  डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, रमेश कराड, प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. 
  • भाजपचे गोपीचंद पडळकर सभागृहात उपस्थित नव्हते.

भाजपने केला सभात्याग 
मुंबई - निवडून आलेली किंवा सरकारी सेवेत असलेली व्यक्तीच लोकसेवक असू शकते, या तत्त्वाला हरताळ फासणारा सरपंच निवडीबद्दलचा अध्यादेश लोकशाहीचा खून करणारा असल्याचा आरोप करत आज भाजपच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेतून सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या कार्यकर्त्यांना सरपंच नेमण्याचा डाव रचत असल्याचा आक्षेप घेत या निर्णयाला न्यायालयात विरोध करण्यात आला होता.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

उच्च न्यायालयात महाधिवक्त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही असे सांगितले असतानाही आज सरकार त्या आश्वासनाला हरताळ फासत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कायदा उल्लंघलेला नाही, कोणतीही घटनाबाह्य भूमिका घेतलेली नाही असे सांगितले. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधेयक मांडायला परवानगी नाही असे कुठे नमूद केले आहे अशी भूमिका घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही अध्यादेश मांडण्यास मज्जाव केला जाऊ शकत नाही असे नमूद केले.त्यावर सरकारची लोकशाही विरोधी भूमिका न्यायालयाने ग्राह्य धरलेली नाही .सरकार नियमांना हरताळ फासत असल्याचा आरोप करत भाजपने सभात्याग केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the Deputy Speaker of the Legislative Council unopposed ramraje naik nimbalkar