esakal | सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाची 'लोगो बनवा' स्पर्धा; जिंका ५० हजारांचं बक्षिस
sakal

बोलून बातमी शोधा

सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाची 'लोगो बनवा' स्पर्धा; जिंका ५० हजारांचं बक्षिस

सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाची 'लोगो बनवा' स्पर्धा; जिंका ५० हजारांचं बक्षिस

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, यास्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा: प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश? चर्चांना उधाण

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसाईक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

हेही वाचा: २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता येणार; 'हे' ११ जिल्हे मात्र कडक निर्बंधातच

या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह (LOGO) स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात. तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट, २०२१ आहे.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना रु.५०,०००/- रु.३०,०००/- व रु.२०,०००/- पारितोषिक प्रदान करण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

loading image
go to top