31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

December 31 Aadhaar–Bank Deadline : जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचे आर्थिक नुकसान होवू शकते.
A reminder displaying important year-end tasks that must be completed before the 31 December deadline to avoid penalties or missed opportunities.

A reminder displaying important year-end tasks that must be completed before the 31 December deadline to avoid penalties or missed opportunities.

esakal

Updated on

December 31 deadline : २०२५ वर्ष संपण्यास अवघे काही दिवसच शिलक आहेत. शिवाय, अनेक महत्त्वाची आर्थिक व्यवहारांशी निगडीत कामे करण्यासाठीची अंतिम मुदतही जवळ येत आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचे आर्थिक नुकसान होवू शकते.

एवढंच नाहीतर तुम्हाला आर्थिक दंड भरावा लागू शकतो,  व्याज आकारले जाऊ शकते आणि बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे किंवा टॅक्स रिफंड देखील अटकू शकते. बँका, आधार आणि कराशी संबंधित अशी तीन महत्त्वाची कामे आहेत, जी तुम्हाला ३१ डिसेंबर पर्यंत करणे अत्यंत आवश्यक आहे आहे.

१. बिलेटेड आणि रिवाइज्ड ITR फाइल करणे आवश्यक -

या वर्षी आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर होती. जर तुम्ही तुमचा आयटीआर वेळेवर दाखल केलेला नसेल, तर तुम्हाला तुमचा बिलेटेड रिटर्न दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ आहे. मात्र, तुम्हाला आयटी कायद्याच्या कलम 234F अंतर्गत विलंब शुल्क आणि कलम 234A अंतर्गत व्याज भरावे लागेल. तसेच, ज्या करदात्यांनी वेळेवर आयटीआर दाखल केलेला आहे. परंतु त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. असे करदाते ३१ डिसेंबरपर्यंत आपला सुधारित आयटी रिटर्न दाखल करू शकतात. त्यासाठी कोणताही विलंब शुल्क लागणार नाही.  परंतु जर त्यांचे कर दायित्व वाढलेले असेल तर त्यांना अतिरिक्त कर आणि व्याज भरावे लागेल.

A reminder displaying important year-end tasks that must be completed before the 31 December deadline to avoid penalties or missed opportunities.
Hinjewadi Flat Ganja Farm : ‘AI’चा असाही गैरवापर!, पुण्यात हिंजवडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये चक्क गांजाची शेती

२. पॅन-आधार लिंकिंग आणि बँक लॉकर अँग्रीमेंट -

जर तुम्ही १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी तुमच्या आधार नोंदणी आयडीचा वापर करून पॅन बनवलं असेल, तर मग तुम्हाला  ३१ डिसेंबरपर्यंत तुमचा पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रिय होवू शकते. परिणामी तुमची अनेक बँकिंगशी आणि कर-संबंधित कामे खोळंबू शकतात.  याव्यतिरिक्त, बँक लॉकर असलेल्यांनी बँकेसोबत अपडेटेड लॉकर भाडे करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेत करार अपडेट न केल्यास लॉकर सील केले जाऊ शकते किंवा वाटप रद्द होण्याचीही शक्यता आहे.

A reminder displaying important year-end tasks that must be completed before the 31 December deadline to avoid penalties or missed opportunities.
Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

३.जीएसटी आणि कंपनी दाखल करण्याची अंतिम तारीख -

आर्थिक वर्ष २०२४-२५साठी जीएसटी वार्षिक रिटर्न (जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९सी) दाखल करण्याची अंतिम तारीख देखील ३१ डिसेंबर आहे. याव्यतिरिक्त, कंपन्यांनी या तारखेपर्यंत त्यांचे वार्षिक रिटर्न आणि आर्थिक विवरणपत्रे (एमजीटी-७ आणि एओसी-४) सादर करावीत. अंतिम मुदत चुकवल्यास मोठा दंड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com