

Kokate Loses Ministry Amid Apartment Scam Case
Esakal
सदनिका गैरव्यवहार प्रकरण मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे हे आधी अधिवेशन काळात ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांनी कृषी खातं गमावलं होतं. आता ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात क्रीडा खातं गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. दुसऱ्या बाजूला कोकाटेंची खाती काढून घेताच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतलीय. पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.