

esakal
Summary
सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार आहे.
शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.
माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली होती मात्र त्यांच्या आमदारकीवर अजूनही टांगती तलवार कायम होती. आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे सुप्रीम कोर्टात धाव घेतली.