कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Minister Manikrao Kokate : सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्यानं कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या मंत्रिपदावरही आता टांगती तलवार आहे.
Manikrao Kokate Sentence Maintained Minister Post At Risk

Manikrao Kokate Sentence Maintained Minister Post At Risk

Esakal

Updated on

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने बनावट दस्तावेज व फसवणूकप्रकरणी ठोठावलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्याविरोधात आज अटक वॉरंट निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यामुळे कोकाटेंचे मंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. तर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले आहेत. यात कोकाटेंबाबत काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com