Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर घेतलं पाणी

आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
manoj jarange
manoj jarange

अंतरवली : मराठा आरक्षणासंबंधी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनुसार विषयांची अंलबजावणी व्हावी तसेच विशेष अधिवेशन तातडीनं घेऊन त्यात कायदा पारित करावा यासाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यावेळी सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले आहेत. (manoj jarange health deteriorated he taken water by insistence of colleagues)

manoj jarange
NCP MLA Disqualification Result: राष्ट्रवादीच्या आमदारांचा आज फैसला! कोण ठरणार अपात्र; राहुल नार्वेकर देणार निकाल

मनोज जरांगे यांना दोन दिवसांपासून पोटात अन्न नसल्यानं पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. तसेच त्यांच्या नाकातूनही रक्त आल्याचं वृत्त होतं. काल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं त्यांच्या नकळत सलाईन चढवलं होतं. यामुळं त्यांची प्रकृती काहीशी स्थिर बनली होती, पण हे सलाईनही त्यांनी नंतर काढून टाकलं होतं. पण आता त्यांची प्रकृती आणखीनच ढासाळली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही घोट पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पाणी घेतलं. (Marathi Tajya Batmya)

manoj jarange
Electoral Bond: सुप्रीम कोर्टानं दिली SBIला डेडलाईन! राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डद्वारे कुणी पैसा दिला? हे जाहीर करण्याचं आवाहन

सध्या या उपोषणस्थळी अंतरवली सराटीत मोठा समाजाची मोठी गर्दी झाली आहे. जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी लोक जमले आहेत. महिलांकडून सरकारकडं जरांगेंच्या मागणीला प्रतिसाद देण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

manoj jarange
Electoral Bond Scheme: इलेक्टोरल बॉण्ड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका

दरम्यान, जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारनं येत्या २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. यावेळी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबतचा नुकताच राज्यात झालेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com