

Jarange meets hunger striker Deepak Borhade
esakal
Dhangar Reservation: मुंबईतल्या आझाद मैदानात धनगर समाजाच्या घटनात्मक एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. त्यातच मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बोऱ्हाडेंची भेट घेतली.
उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनगर बांधवांना विनंती आहे.. आरक्षण मिळावे, न्याय मिळावा असे वाटत असेल तर घरात थांबू नका.. आरक्षणासाठी एकत्र या, फूट पडू देऊ नका. मी ताकदीने बोऱ्हाडे यांच्यासोबत उभा राहणार काळजी करू नका, असा शब्द पाटलांनी यावेळी त्यांनी दिला.