जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. आता त्यांनी पुन्हा आंदोलनाची परवानगी मागितली आहे.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज केला आहे. परवानगी दिली नाही तरी मुंबईला जाण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. सुरुवातीला ५ हजार जणांच्या आंदोलनाला परवानगी मागितली होती. त्यानंतर एकटाच जाणार अशी घोषणा केली. आता जरांगे पाटील यांनी ५ ते ५० लोकांना आंदोलनाची परवानगी द्यावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही असं म्हणत परवानगी मागणारं पत्र मुंबई पोलिसांना पाठवलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com