

NEET Paper Leak Sparks National Controversy
esakal
ठाणे : ३ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात पेपरफुटीची पाच प्रकरणे झाली आहेत; त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, खरोखर राज्यात कायदा अन् सुव्यवस्था आहे का, हे जाहीर करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले.