Shivsena
ShivsenaShivsena

मंठा नगरपंचायतची सत्ता सेनेच्या हाती; 16 पैकी 12 जागा ताब्यात

शिवसेना बारा, काँग्रेस व भारतीय जनता पार्टी प्रत्येकी दोन राष्ट्रवादी काँग्रेसची एक.

मंठा : मंठा नगरपंचायतच्या सोळा प्रभागाची मतमोजणी बुधवारी ( ता. १९ ) तहसील कार्यालयात पार पडली असून, नगरपंचायतमध्ये शिवसेनेला (Shivsena) एकहाखी सत्ता मिळाली आहे. मंठा नगरपंचायतची निवडणूक (Mantha Nagar Panchayat Election 2022) काही ठिकाणी खूप अटीतटीची झाली, तर काही ठिकाणी उमेदवारास अनामत रक्कम देखील वाचता आली नाही. मतमोजणीत शिवसेनेला सोळा पैकी अकरा व एक जागा बिनविरोधी असे एकूण बारा उमेदवार निवडूण आले आहेत. तर काँग्रेस व भारतीय जनता पार्टीचे (Congress,BJP) प्रत्येकी दोन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे.

मतमोजणी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे, नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. निवडून आलेले सतरा उमेदवार व त्यांना पडलेली मते, प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यास पडलेली मते याप्रमाणे आहेत.

Shivsena
नगरपंचायत निकालानंतर उदय सामंत म्हणाले, महाआघाडीचा पराभव मान्य....

मंठा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक

प्रभाग क्रमांक एक : अच्चुत बोराडे ५१३ ( विजयी )शिवसेना,

शरद बोराडे १२३ ( कॉंग्रेस ).

प्रभाग क्रमांक दोन : पठाण बाज २२७ ( विजयी ) राष्ट्रवादी काँग्रेस,

शेख तांबोळी नासेर २२० काँग्रेस.

प्रभाग क्रमांक तीन : शेख साजेद जलील ३०३ ( विजयी ) काँग्रेस,

कदीर शाह हुसेन २४५ एमआयएम.

प्रभाग क्रमांक चार : नंदा उत्तमराव राठोड ६९५ ( विजयी ) शिवसेना,

कुरेशी बिलकिस बेगम २४६ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक पाच : दीपक आसाराम बोराडे ३९१ ( विजयी ) शिवसेना,

खान साराराज २२७ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक सहा : यमुना शेषनारायण दवणे ३०० ( विजयी ), भारतीय जनता पार्टी,

सीमा नीरज सोमाणी २३८ शिवसेना.

प्रभाग क्रमांक सात : छाया अरुण वाघमारे ३९२ ( विजयी ), शिवसेना,

मनीषा प्रदीप मोरे २३८ एमआयएम.

प्रभाग क्रमांक आठ : अशोक रावसाहेब खंदारे ५९३ ( विजयी ) काँग्रेस,

प्रदीप वाघमारे २७ शिवसेना.

प्रभाग क्रमांक नऊ : खाटिक इरमसबा रशीद ५५४ ( विजयी ) शिवसेना,

कुरेशी हिना युनुस ३३२ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक दहा : मीना सचिन बोराडे ( बिनविरोध ) शिवसेना

प्रभाग क्रमांक अकरा : बागवान खय्युम याशीन ५०६ ( विजयी ) शिवसेना,

कुरेशी फातेमा बी कुरेशी हबीब २७७ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक बारा : वंदना वैजनाथ बोराडे ९८६ ( विजयी ) शिवसेना,

आनसाबाई शाहू राठोड ३१ भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक तेरा : मीरा बालासाहेब बोराडे ५१० ( विजयी ) शिवसेना,

आशा सुरेश वाव्हळे २७ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक चौदा : सुषमा प्रदीप बोराडे ५५८ ( विजयी ) शिवसेना,

रेणुका दत्तात्रय बोराडे २२ काँग्रेस.

प्रभाग क्रमांक पंधरा : सरोजा प्रल्‍हाद बोराडे ३२९ ( विजय ) शिवसेना,

साधना भवन केंधळे ३०५ भारतीय जनता पार्टी.

प्रभाग क्रमांक सोळा : शोभा प्रसाद बोराडे ४९२ ( विजय ) भारतीय जनता पार्टी,

जयश्री आबासाहेब बोराडे २३९ शिवसेना.

प्रभाग क्रमांक सतरा : विकास सूर्यवंशी ३४३ ( विजयी ) शिवसेना,

कुरेशी मुसा बाबामिया ३३४ काँग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com