esakal | शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील बरेच आमदार सहमत
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

काँग्रेसच्या 45 पैकी 30-35 आमदारांना शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे वाटत आहे. तर, जेष्ठ काँग्रेस नेते मात्र दिल्लीतील आदेशाची वाट पाहत आहेत.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील बरेच आमदार सहमत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील बरेच आमदार सहमत आहेत. एका मोठ्या गटाला शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे वाटते. यामधे काही नवे आमदार आग्रही आहेत, असे समोर आले आहे. 

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट

आज (बुधवार) सकाळीच काँग्रेसच्या उपाध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांची भेट घेतली. दिल्लीत अहमद पटेल व नितीन गडकरी यांची भेट झाल्यानंतर काँग्रेसमधल्या आमदारांत चर्चा सुरु झाली आहे. 

शिवसेनेचे बडे नेते म्हणतात, झाले गेले विसरून एकत्र येऊ

काँग्रेसच्या 45 पैकी 30-35 आमदारांना शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे वाटत आहे. तर, जेष्ठ काँग्रेस नेते मात्र दिल्लीतील आदेशाची वाट पाहत आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु आहेत.

loading image